पुनावळे येथून कारमधील ५० लाखांची बॅग चोरणारे आरोपी ८ तासांत जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-२ आणि रावेत पोलिसांची कामगिरी
पुनावळे येथे कारमधून बनावट चावीच्या साह्याने ५० लाखांची रोकड चोरणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा व रावेत पोलिसांनी आठ तासांत अटक केली.

पिंपरी : पुनावळे येथील हॉटेलसमोरील सर्व्हिस रोडवर पार्क केलेल्या कारची बनावट चावी वापरून ५० लाखांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली होती. गुन्हे शाखा युनिट-२ आणि रावेत पोलिसांनी अवघ्या आठ तासांत या गुन्ह्याचा उलगडा केला.
प्रसाद शिवाजी बनकर (वय २९) आणि चारुदत्त शिवाजी बंडाले (वय ३०) या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण ५० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
