मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय तर पुरंदर तालुक्यातील आदचिवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

पुणे : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला असून पुरंदर तालुक्यातील आदचिवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अभियानातून सुमारे २४५ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला.
रोजगार हमी योजना, जलसंधारण, सौरऊर्जा आणि शाळा-अंगणवाडी सुधारणांमध्ये उल्लेखनीय काम झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळाले.
