आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    सेवा संकल्प अभियानांतर्गत योग व ध्यान सत्र तसेच मानसिक आरोग्य जनजागृती

    कुमकुम येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत योग व ध्यान सत्र तसेच मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १४ ऑक्टोबर २०२६

    पुणे : योग व प्राणायामाबद्दल जागरूकता निर्माण करणे, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व देणे, तणावमुक्त जीवनाला प्रोत्साहन देणे आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सेवा दवाखाना, कुमकुम येथे योग व ध्यान सत्र तसेच मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    योग करा, मन शांत ठेवा आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहा, असा संदेश यावेळी देण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासचे फायदे, प्राणायाम, शारीरिक आरोग्याचे संवर्धन तसेच निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले.

    मानसिक आरोग्याचे महत्त्व, तणाव व्यवस्थापन, चिंता कमी करण्यासाठी योग व प्राणायामाची भूमिका, मनःशांती, सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक संतुलन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मानसिक आरोग्याची काळजी घेणे, पुरेशी झोप घेणे आणि दैनंदिन जीवनात योग व ध्यानाचा समावेश करावा, असे आवाहन करण्यात आले.