आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    नांदेड जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे : पालकमंत्री अतुल सावे

    नांदेड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या योग्य नियोजनासाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १४ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनाने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गठित जिल्हासतरीय सनियंत्रण समितीची पालकमंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ऑनलाइन बैठक झाली.

    नांदेड जिल्ह्यातील १०८ प्रकल्पात सध्या ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मंजूर पाणीसाठ्यातिरिक्त प्रत्येक प्रमुख जलाशयाच्याउपलब्ध जीवंत पाणीसाठ्यापैकी किमान १० टक्के साठा आपातकालीन साठा म्हणून राखून ठेवण्यात यावा. बफर साठा हा अपेक्षित पर्जन्यमानातील घट, दीर्घ कोरडा कालावधी किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी राखीव राहील.

    जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी जोडणीवर तात्काळ कारवाई करावी, महापालिका क्षेत्रात पाणी गळतीवर नियंत्रण आणावे, आणि पाणी टंचाईच्या अनुषंगाने योग्य नियोजन करावे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.