आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    आरोग्य नवोन्मेष आणि गुणवत्ता सुधारणेसाठी राज्यस्तरीय 'लिव्हिंग लॅब' विकसित : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना

    महाराष्ट्रात आरोग्य नवोन्मेष आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यस्तरीय 'लिव्हिंग लॅब' विकसित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १४ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : महाराष्ट्राच्या 'सर्वांसाठी आरोग्य' या ध्येयाला पूरक ठरारी आरोग्य नवोन्मेष आणि गुणवत्ता सुधारणेसाठी राज्यस्तरीय 'लिव्हिंग लॅब' विकसित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून आरोग्य सुविधांचा दर्जा आणि गुणवत्ता मानाटकांचे पालन करण्यासह राज्यातील नागरिकांसाठी कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सुद्धा भर देण्यात येणार आहे.

    स्थानिक आरोग्यविषयक प्राधान्य निश्चित करणे, समुदायासोबत उद्देशानुरूप उपाय तयार करणे आणि प्रत्यक्ष आरोग्य व्यवस्थेत नवीन पद्धतींची चाचणी घेणे, हा या व्यासपीठाचा उद्देश आहे. शासन, शैक्षणिक संस्था, नवोन्मेष आणि विकास भागीदारांचे अनुभव व क्षमता एका सामाजिक व्यासपीठावर आणून सध्याची आरोग्य व्यवस्था आणि उपचार मार्ग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न 'लिव्हिंग लॅब'च्या माध्यमातून केला जाणार आहे.

    'द फेडरेशन ऑफ ऑब्सट्रेटिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया' चा 'मान्यता' हा प्रमुख उपक्रम या दृष्टिकोनाचा प्रारंभिक उदाहरण आहे. मातृ आरोग्यसेवा बळकट करण्याच्या शासनाच्या प्रस्तावांना पूरक असलेल्या या उपक्रमातून खाजगी क्षेत्रातील गुणवत्ता सुधारणा प्रारूप सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेशी कशा प्रकारे कार्य करू शकते, हे दिसून येते.