आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गावर 'हवाई रुग्णवाहिका' सेवा सुरू करणार! - मंत्री प्रताप सरनाईक

    राज्यातील महामार्गांवर अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'हवाई रुग्णवाहिका' सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १४ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर व रस्ते अपघातातील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यात मदत व्हावी, या उद्देशाने 'हवाई रुग्णवाहिका' सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अपघातानंतरचा पहिला तास, म्हणजेच 'गोल्डन अवर', हा जखमींच्या उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या निर्णायक काळात जखमींना तातडीने ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवा प्रभावी ठरू शकते, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.

    मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, आरोग्य विभागाचे संचालक संजय काटकर, वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक डॉ. सुनील भारद्वाज यांच्यासह मोटर वाहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    या प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करून तिला मंजुरी घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.