आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    राज्यात 'चारा साक्षरता व संवर्धन अभियान' राबविणार

    संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यभरात 'चारा साक्षरता व संवर्धन अभियान' राबविण्यात येणार आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १४ ऑक्टोबर २०२६

    पुणे : राज्यातील काही भागांमध्ये पर्जन्यमानात तूट आणि खरीप पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम लक्षात घेता, आगामी काळात पशुधनासाठी हिरवा व वाळलेला चारा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभरात 'चारा साक्षरता व संवर्धन अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत चारा जतन, पिक अवशेषांची योग्य वापर, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन बाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

    चारा उत्पादनाबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे. निकृष्ट व वाळलेल्या चाऱ्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी शिफारस करण्यात आलेल्या प्रक्रियेची माहिती दिली जाईल. कडबा व पेंढ्यावर युरिया प्रक्रिया करण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण, तसेच चाऱ्याची नासाडी कमी करण्यासाठी कडबाकुट्टी यंत्राच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मुरघास, हायड्रोपोनिक चारा व हिरवा चारा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये मुरघास निर्मितीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

    सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांच्या काही कालखंडात आणि कमी पाण्यात वाढणाऱ्या चाऱ्याचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. धरणे व तलावातील पाणी ओसरल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या गाळपेरा क्षेत्रात चारा पेरणी करण्याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे. गावपातळीवर प्रशिक्षण व जनजागृतीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी, सहायक पशुविकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहभागातून विविध संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल.