आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    महाराष्ट्राबाहेरची खासगी वाहनांच्या तपासणीसाठी परिवहन विभागाची विशेष मोहीम

    परिवहन महर्षीमार्फत महाराष्ट्राबाहेर नोंदणीकृत खासगी वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १४ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे: महाराष्ट्र राज्याबाहेर नोंदणीकृत असून महाराष्ट्रात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या खासगी वाहनांची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागामार्फत १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदारे वाहनांची नोंदणी, करभरणा आणि आवश्यक कागदपत्रे यांची पडताळणी सुरू आहे. मोटर वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ४७ अन्वये, एका राज्यात नोंदणीकृत वाहन दुसऱ्या राज्यात वर्षपेक्षा अधिक कालावधीसाठी वापरले असल्यास संबंधित राज्यात वाहनांची पुनर्नोडणी करून विहित मोटर वाहन कर भरणे आवश्यक आहे.

    जेजुरी येथे १४ ऑक्टोबरला शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिर: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या क्षेत्रातील विविध शिबिरांच्या ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्तीची वैधता संपलेल्या पक्क्या अनुज्ञप्तीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या अर्जदारांना दिलासा देण्यासाठी जेजुरी येथे बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी अतिरिक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत संपत असलेल्या अर्जदारांना प्रक्रिया नियोजित वेळेत उपस्थित राहता येत नसल्यास कार्यालयाने निवेदने प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    RMK समूहातर्फे मावळमध्ये यावर्षी २,५०० कोटींची गुंतवणूक व ४,००० थेट रोजगार: तळेगाव दाभाडे: RMK EIM ही कंपनी अवजड मालवाहतुकीसाठी बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानावर चालणारे इलेक्ट्रिक ट्रॅक तयार करते. कंपनीच्या ५५ टन क्षमतेचा 'अश्वा' (Ashwa) इलेक्ट्रिक ट्रक सुमारे सात मिनिटांत संपलेली बैटरी बदलून पुन्हा प्रवासासाठी सज्ज होतो, त्यामुळे वाहतुकीतील वेळ वाचतो आणि डिझेलचा वापर व प्रदूषण कमी होते.