आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    जेड्ब्ल्यू मॅरियटकुडून 'स्टे इन द मोमेंट' मोहीम लाँच, मोहिमेमध्ये ग्लोबल ब्रँड अँबेसेडर ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश

    जेड्ब्ल्यू मॅरियटने ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश असलेली 'स्टे इन द मोमेंट' मोहीम लाँच केली आहे, तसेच पुण्यात एसएमईचा वार्षिक मेळावा झाला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १४ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे: जेड्ब्ल्यू मॅरियट या मॅरियट बाँड्रॅचच्या ३० हून अधिक ब्रँड्सच्या जागतिक पोर्टफोलिओचा भाग असलेल्या ब्रँड आज ग्लोबल ब्रँड अँबेसेडर ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश असलेली जाहिरात सादर केली. ब्रँडच्या 'स्टे इन द मोमेंट' संकल्पनेवर आधारित असलेली ही जाहिरात आपण स्वतःला वर्तमानात समर्पित करतो तेव्हा निर्माण होणारा आनंद आणि बंध साजरा करते. खऱ्या आरोग्याची आणि समाधानाची सुरवात स्वतःला परिपूर्ण, वर्तमानात उपस्थित आणि जोडलेले राहणे अनुभवण्यासाठी वेळ काढण्यापासून होते, या जेड्ब्ल्यू मॅरियटच्या दीर्घकालीन विश्वासाचे प्रतिबिंब या मोहिमेच्या मूळ विचारात दिसून येते.

    जूनमध्ये जाहीर झालेल्या सहयोगापुढे नेत, या जाहिरातीची सुरवात एका साध्या प्रश्नाने होते: 'एखाद्या क्षणाला खरा क्षण काय बनते? जेड्ब्ल्यू मॅरियट जुहू येथे शूटिंग करण्यात आलेली ही जाहिरात ऐश्वर्या राय बच्चन यांना अत्यंत आत्मीय, निवांत आणि आनंदने भरलेल्या क्षणाचा अनुभव घेताना दाखवते. लग्नसमारंभाचा आनंद असो, हास्य, जिव्हाळा आणि सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींच्या सहवासात असणे असो, एकत्र जेवणाचा आस्वाद घेणे असो, आनंद व्यक्त करणे किंवा काहीतरी नवीन शोधणे असो, आपण पूर्णपणे वर्तमानात असतो तेव्हा अत्यंत साधे अनुभवी अर्थपूर्ण बनतात यावर ही जाहिरात प्रकाश टाकते.

    पुण्यात झालेल्या एसएमई महाराष्ट्र सेक्शनच्या वार्षिक मेळाव्यात पायपिंग अभियांत्रिकी, औद्योगिक रचना, तांत्रिक मानके आणि अभियंत्यांच्या कौशल्यविकासावर भर देण्यात आला. अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स (एसएमई) इंडियाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात १८५ हून अधिक अभियंते, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले. एसएमई इंडिया प्रांजेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि संस्थापक मधुकर शर्मा यांनी महाराष्ट्राचे औद्योगिक महत्त्व अधोरेखित केले.