इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात गैरव्यवहार; विकासकांवर कारवाई करा : दुर्योधन कदम
पिंपरीतील इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत विकासकावर कारवाईची मागणी दुर्योधन कदम यांनी केली आहे.

पिंपरी : पिंपरी: चिंचवड येथील इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पात मोठ्या प्रमाणात अनियमितता, गैरव्यवहार आणि पात्र झोपडपट्टीची दिशाभूल होत असल्याचा गंभीर आरोप इंदिरानगर पुनर्वसन विकास संस्थेचे अध्यक्ष दुर्योधन कदम यांनी केला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी विकासकांना काळ्या यादीत टाकावे आणि संबंधितांवर फौजदेशीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी पत्रपरिषदे केली. यावेळी संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड. अजित बोराडे उपस्थित होते.
कदम म्हणाले की, इंदिरानगर परिसरात गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून वास्तव्य असलेल्या अनेक झोपडधारकांची नावाचे पुनर्वसनाची पात्रता यादीतून वगळण्यात आली आहे. दुसरीकडे काही अपात्र व बाहेरील व्यक्तींचा संस्थास्पद समावेश करण्यात आला आहे. सर्वेक्षण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून नागरिकांच्या हरकती अधिकाऱ्यांकडून मान्यता मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आवश्यक परवानगी असल्याशिवाय बांधकामाच्या ठिकाणी माहितीफलक नसल्याबाबतही त्यांनी आक्षेप घेतला.
या प्रकरणी दुर्योधन कदम यांच्या वतीने संस्थेचे कायदेशीर सल्लागार ड. अजित बोराडे यांनी पुणे एसआरए कार्यालयाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. पात्रता यादीची फेरतपासणी, संशयस्पद लाभार्थ्यांची चौकशी, सर्वेक्षण नोंदी उपलब्ध करून देणे आणि नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीत गैरव्यवहार सिद्ध झाल्यास संबंधित विकासकांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पात्र नागरिकांच्या संरक्षणासाठी करून आवश्यक असल्यास नवीन विकासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
