पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा; टँकर हा शेवटचा पर्याय ठेवा - मंत्री गुलाबराव पाटील
पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि टँकर हा शेवटचा पर्याय ठेवण्याचे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मुंबई : मुंबई: पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून ती कार्यान्वित करावीत. टँकरद्वारे पाणीपुरवठा हा पहिला पर्याय नसून शेवटचा पर्याय असला पाहिजे. त्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मंत्रालयात पाणीटंचाईच्या अनुषंगाने नेवासा विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा आढावा घेताना प्रलंबित १८ योजनांपैकी १६ रेट्रोफिटिंग योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
पाणीटंचाईच्या कालावधीत टँकर सुरू करण्याऐवजी आवश्यकतेनुसार विहिरींचे अधिग्रहण, तात्पुरत्या नळयोजना व पाइपलाइनचे कामे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच आडवे बोअर घेणे यांसारख्या पर्यायी उपायांना प्राधान्याने राबवाव्यात. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून टंचाईग्रस्त गावांना शाश्वत व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कारवाई करावी, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
