महिला उद्योजkelela प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महिला उद्योजतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात 'महिला स्टार्ट अप हब' स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई : मुंबई: महिला उद्योजतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात महिला उद्योजकता हब स्थापन करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि उद्यती फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याद्वारे महाराष्ट्राच्या महिला उद्योजिकांसाठी अधिक सक्षम वातावरण तयार करण्याच्या आणि महिलांना वित्तपुरवठा, व्यवसाय सहाय्य मिळवून देण्यात येणार आहे.
या करारांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व उद्यती फाऊंडेशन तांत्रिक व ज्ञान भागीदार म्हणून कार्य करून राज्य-आधारित महिला स्टार्ट अप हब स्थापन करण्यास मदत करणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी यामुळे चालना मिळणार आहे. राज्यातील महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देऊन संस्थात्मक यंत्रणा मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल.
उद्यती फाऊंडेशन भारतातील महिलांच्या उद्योग क्षेत्रात सहभागाला गती देण्यासाठी कार्यरत आहे. राज्य शासन आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांसोबत सहकार्य करून १५ दशलक्ष रोजगाराच्या प्रवाहात असलेल्या महिलांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट या संस्थेचे आहे. महिलांना रोजगार मिळवण्यात येणारे अडथळे दूर करणे, महिला उद्योजकता परिसंस्था मजबूत करणे, निवास, गतिशीलता आणि बालसंगोपन यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा डेटा-आधारित प्लॅटफॉर्मद्वारे बळकट करणे, 'विकसित भारत २०४७' या राष्ट्रीय दृष्टिकोनाला गती मिळेल.
