आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    पक्षादेश डावललायचा आरोप; 'या' पक्षाकडून ६ नगरसेवकांची हाकलपट्टी

    भिवंडी महापालिकेत पक्षाचा आदेश डावलून भाजप समर्थकांना पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षाच्या ६ नगरसेवकांची हाकलपट्टी करण्यात आली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १६ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : मुंबई : भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांचे निवडून करून समाजवादी पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचा आदेश डावलून भाजप आमदार महेश चौगुले यांचे समर्थक मानले सहा नगरसेवकांची हाकलपट्टी केली आहे. या कारवाईमुळे भिवंडीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. समाजवादी पंचेचे प्रदेशाध्यक्ष अबू आसीम अझमी यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी ही कारवाई जाहीर केली. हाकलपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये आरिफ याकूब शेख, काशफी शाफ मोमिन, अजीज जमाल मोमिन, अन्सरी शबाना शमीम, शेख सलमानाबानो मोहम्मद अक्रम आणि खान अमल उबैद यांचा समावेश आहे.

    भिवंडी महानगरपालिकेच्या विशेष महासभेत महापाैर नारायण चौधरी यांनी नऊ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. निवड झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी मिरवणुका काढून निवडीचा उत्सव साजरा करण्यात आला. मात्र, समाजवादी पक्षाच्या गोटात या निवडीवरून नाराजी निर्माण झाली.