रबी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकंचे परवाने निलंबित,जिल्हास्तरीय भरारी पथक व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांची कारवाई
पुणे जिल्ह्यात रबी हंगामातील खत विक्रीत गंभीर अनियमितता आढळल्याने कृषि विभागाने चार विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत.
पुणे : पुणे : रबी हंगाम २०१६ मध्ये निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथक व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी पुणे जिल्ह्यातील खत विक्रेत्यांच्या तपासण्या केल्या. या तपासण्यादरम्यान गंभीर अनियमितता आढळलेल्या खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, चार विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच दोन विक्रेत्यांना सख्त ताकीद देण्यात आली आहे.
कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीदरम्यान विक्री परवान्यातील साठा नोंदवहीत शुल्क असलेला खतासाठी आणि प्रत्यक्ष उपलब्ध खतासाठ्यामध्ये तफावत असणे, विक्री परवान्यात नसलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री करणे, जादा दराने खत विक्री करणे, नोंदणी प्रमाणपत्राने विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, परवाना ग्राहकाला दिसेल अशा ठिकाणी न लावणे, खत विक्रीचा मासिक प्रगती अहवाल अधिकाऱ्यांना सादर न करणे आणि मुदतबाह्य निविष्ठा विक्रीसाठी ठेवणे, अशा त्रुटी आढळून आल्या. अनियमितेमुळे संबंधित खत विक्रेत्यांविरुद्ध नियमुसार कारवाई करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना योग्य दर्जाची खते, रस्त दरात आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषि विभागामार्फत तपासणी व गुणवत्तेची मोहीम राबविण्यात येत आहे. खत विक्रेत्यांनी विक्री परवान्यातील अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे. साठा नोंदवही अद्ययावत ठेवावी, दरपत्रक व उपलब्ध साठ्याची माहिती दर्शनी भागात लावावी आणि शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
