महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हुंदाई मोटर इंडिया'च्या पुणे प्लांटचे उद्घाटन
तळेगाव (पुणे) येथे हुंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या अत्याधुनिक उत्पादन प्लांटचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

पुणे : पुणे : हुंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल) आज महाराष्ट्रातील तळेगाव, पुणे येथील आपल्या अत्याधुनिक उत्पादन प्लांटच्या औपचारिक उद्घात्नाची घोषणा केली, जो भारतातील कंपनीच्या वाढीच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या प्लांटचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी भारतासाठी कोरियाच्या प्रजासत्ताकाचे राजदूत महामहिम ली सेऑग-हो; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार; हुंदाई मोटर ग्रुपचे (एचएमजी) एक्झिक्युटिव्ह चेअर श्री. युसन चंग, एचएमजीचे व्हाईस चेअर श्री. जेहून चांग, हुंदाई मोटर कंपनीचे (एचएमसी) प्रेसिडेंट व सीईओ श्री. होजे मुनोज आणि एचएमआयएलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. तरुण गगर् उपस्थित होते.
या विशेष प्रसंगी, एचएमआयएलने १९९९ पासून भारतातून ४ दलसक प्रवासी वाहनांच्या एकत्रित निर्यातीची ऐतिहासिक कामगिरी देखील साजरी केली, याद्वारे भारताला जागतिक ऑटोमोटिव्ह उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या कंपनीचे धोरण अधोरेखित केले. एकत्रितपणे, एचएमआयएलएप्त् प्रवासी वाहनांची सर्वात मोठी निर्यातदार आणि भारतामधून ४ दशलक्ष निर्यातीचा टप्पा गाठणारी पहिली ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी ठरली आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारपेठ जवळजवळ १० दशलक्ष प्रवासी वाहनांची विक्री केली आहे, ज्यामध्ये भारतीय ग्राहकांदी कंपनीची प्रबळ आणि निरंतर उपस्थिती दिसून येते. भारतामधील उत्पादन क्षेत्रातील वाढीसाठी एचएमआयएलच्या बहुमूल्य योगदानाचे कौतुक करत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, हुंदाई मोटर इंडियाच्या पुणे प्लांटचे उद्घाटन कंपनीने साध्य केलेली ४ दशलक्ष प्रवासी वाहनांची एकत्रित निर्यातीची कामगिरी जागतिक ऑटोमोटिव्ह उत्पादन केंद्र म्हणून भारताची वाढती ताकत दर्शवते. प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, नाविन्यता, स्थानीयकरण आणि कौशल्य विकासातील हुंदाईची सातत्यपूर्ण गुंतवणूक महाराष्ट्रातील आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि प्रबळ ऑटोमोटिव्ह परिसंस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल. आम्ही राज्य आणि देशाप्रती हुंदाईच्या दीर्घकालीन कटिबद्धतेला स्वागत करतो. महाराष्ट्र सरकार हुंदाईच्या भविष्यातील वाढीच्या प्रवासाला पाठबळ देईल.
जागतिक पातळीवर एचएमआयएलच्या सर्वात प्रगत उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून विकसित केलेला पुणे प्लांट इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञान, एआय-सक्षम उत्पादन यंत्रणा, प्रगत गुणवत्ता व्यवस्थापन प्रक्रिया आणि पूर्णपणे एकात्मिक डिजिटल उत्पादन परिसंस्था एकत्र आणतो.
