पक्षाशी काय केले ते आधी सांगा; मग पद मागα! मुख्यमंत्री फडणवीसांचा पुण्यातील आमदार, नगरसेवकांना सज्जड दम
पुण्यातील भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाशी काय केले ते आधी सांगा, मग पद मागा असा सज्जड दम भरला.

पुणे : पुणे : 'मी भाषण करायला आलेलो नाही. तुम्ही किती गंभीर आहात, हे सांगायला आलो आहे. तुम्ही सगळे नेते झाला आहात; पण पक्षाच्या जीवावर निवडून येतात, हे विसरत आहात. प्रत्येकाला स्वतःचे पडले आहे. पक्षासाठी काम करण्यापेक्षा नेत्यांच्या पुढे पुढे करून पदे मिळविण्याचे दिवस आता संपले आहेत,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सज्जड दम भरला.
पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेला मिळालेल्या अल्प प्रतिसादानावरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून यापुढे प्रत्येक 'रिपोर्ट कार्ड' तयार करण्याचा इशारा दिला. पक्षात, सत्तेत पद मागवायला येणाऱ्यांना आधी पक्षासाठी काय केले, याचा हिसाब द्यावा लागेल. पदे देताना हे रिपोर्ट कार्ड निर्णायक ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून केवळ ५५ हजार मतदारसंघांची नोंदणी झाल्याचे चित्र समोर आल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यापैकी पुणे शहरातील नोंदणी अवघी २८ हजार असल्याचे त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. प्रदेशध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन लाख लक्ष नोंदीचे लक्ष्य दिले होते. किमान डेढ़ लाख मतदारसंघाची नोंदणी होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्ष्यातील आकडा खूपच कमी असल्याने फडणवीस यांनी कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले. 'भाजप विधान परिषदेत सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही किती गंभीर आहात, हे दिसून येते,' असे फडणवीस म्हणाले.
'तुमचे प्राधान्य स्वतःला; पक्षाला नाही!' पुण्यातला आमदार, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींचे प्राधान्य स्वतःच्या कामाला आहे. पक्षाला प्राधान्य देण्याची पद्धत तुमच्याकडे नाही. पक्षाची वेळ आली की तुमचे प्राधान्यक्रम बदलतात,' अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या पाठबळावर निवडून आल्या्यानंतर पक्षासाठी काम करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, याची जाणीव त्यांनी करून दिली. 'तुम्ही किती मोठे आहात,याच्याशी मला काही घेणेदेणे नाही. नेत्यांच्या पुढे पुढे कामे होतील पदे मिळतील, असे आता चालणार नाही,' असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. गृहमंत्री म्हणून यंत्रणा लावणार यापुढील काळात आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 'गृहमंत्री म्हणून माझी स्वतःची यंत्रणा लावून सबकी रिपोर्ट कार्ड तयार करणार आहे,' असा सूचक इशारा त्यांनी दिला.
