आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    सेवा संकल्प अभियानांतर्गत तिन्हेवाडी व फुलवडे येथे आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतूकवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून चाऱ्याची टंचाई टाळण्यासाठी जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र फुलवडे यांच्या वतीने विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तिन्हेवाडी येथे 'सेवा संकल्प अभियान' आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण ३५८ रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) तपासणी करण्यात आली. यामध्ये १५५ नागरिकांची उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी, २२६ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणीदरम्यान १७ जणांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले. तसेच ३८ महिलांची व बालकांची आरोग्य तपासणी, तर ७३ नागरिकांची मुख कर्करोग तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र फुलवडे यांच्या वतीने श्रीरंग गाभाडे हायस्कूल तसेच जिल्हा परिषद शाळा, नांदळकरवाडी आणि मोहितेवाडी येथील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात आला. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी करून घेण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

    या उपक्रमामुळे प्रतिमज्जात्मक आरोग्य तपासणीला चालना मिळून नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, डॉ. शुभम खराबे, डॉ. पूनम नाईकवाडी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रजनी कातारे, आरोग्य निरीक्षक भूषण भारती, सर्व आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, गटप्रवर्तक, आशा सेविका, परिचर तसेच क्षेत्रकर्णातील मान्यवर उपस्थित होते.

    पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुका व ओा चारा, तसेच कडबा, कुट्टी आणि पांडा यांसारख्या चारा प्रकारांची वाहतूक व विक्री करण्यास सक्ती करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेन्द्र डुडी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला आदेशापासून सूट देण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेश जारी होईपर्यंत लागू राहून, याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.