आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    सेवा संकल्प अभियानांतर्गत बावडा येथे कर्करोग तपासणी शिबिर उत्साहात संपन्न; २४४ लाभार्थ्यांची तपासणी

    इंदापूर तालुक्यातील बावडा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित कर्करोग तपासणी शिबिरात २४४ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे, नागरिकांमध्ये कर्करोगविषयक जनजागृती निर्माण व्हावी आणि संभाव्य रुग्णांना वेळेची उपचार मिळावे, या उद्देशाने इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बावडा येथे कर्करोग तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण २४४ लाभार्थ्यांची तपासणी व स्क्रीनिंग करण्यात आले. या शिबिरामध्ये तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग या तीन प्रमुख प्रकारांच्या तपासणीवर विशेष भर देण्यात आला. कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर्करोग तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यामध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता.

    हे शिबिर पुणे आरोग्य विभागाचे उपसंचालक, डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनखाली आयोजित करण्यात आले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे, डॉ. भाग्यश्री पाटील; निवासी वैद्यकीय अधिकारी, पुणे, डॉ. वंदना जोशी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे, डॉ. वसावे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. उत्कृष्ट नियोजन, प्रभावी समन्वय, सेवाभावी वृत्ती आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर हा आरोग्यविषयक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात जनजागृती, नियमित तपासणी आणि वेळेवर निदान हीच प्रभावी शस्त्रे आहेत. नागरिकांनी आरोग्यविषयक लक्ष्यांकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करून आणि आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. लवकर निदान, प्रभावी उपचार, निरोगी समाज हे ध्येय समोर ठेवून कर्करोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. बावडा येथे आयोजित केलेले हे शिबिर सार्वजनिक आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.