आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान तर्फे कोथरूड नवरात्रोत्सवात रंगणार विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक उत्सवाला लोकलंजना बरोबरच सामाजिक उपक्रमांची जोड : संदीप खर्डेकर

    कोथरूडमध्ये क्रिएटिव्ह फाऊंडेशन व कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान तर्फे कोथरूड नवरात्र महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून कोथरूड डी पी रस्त्यावरील बधाई स्वीट चौक येथे हे कार्यक्रम होणार असल्याच्या महोत्सवाचे संयोजक विशाल भेलके, प्रतीक भेलके व उमेश भेलके यांनी सांगितले. स्थापनानंतर प्रत्येक वाद्याच्या पथकाच्या उत्तम ढोल वादनाने महोत्सवाची सुरुवात झाली असून आमच्या क्रिएटिव्ह फाऊंडेशन च्या तत्वानुसार हम सर्व उत्सवांना सामाजिक कार्याची व लोकोपयोगी साहित्य वाटपाची जोड देऊन त्यानंतर यावर्षी दिव्यांगांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था, संघटनांना मदत केली जाणार कोथरूड नवरात्रोत्सवाचे मार्गदर्शक संदीप खर्डेकर व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त नगरसेविका मजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.

    येथील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सौ. श्वेताली भेलके, सौ. अक्षदा भेलके, कल्याण्णी खर्डेकर व सी. अक्षदा भेलके यांनी केले असून यात गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत बाल जत्रा आयोजित केली असून तिथे मुलांना विविध खेळांचा आनंद घेता येणार आहे.१६ व १८ ऑक्टोबर रोजी लहान मुलांच्या स्पर्धा तसेच महिलांची महानीआरती, भांडला व लहान मुलांची स्पर्धा, डान्सर रंगान असून बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी सायं ७ ते १० दिलबराच्यासाठी हा लावणीचा कार्यक्रम होणार असून गुरुवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सायं ७ ते १० मायबोली महाराष्ट्राची हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते १० यावेळेत ऑर्केस्ट्रा अलबेला हा ज्यु हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असूनार असत्याच्या शेवटी भेलके, कल्याण्णी खर्डेकर व अक्षदा भेलके यांनी सांगितले.

    नेहरकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ रंगला वहिणींचा कार्यक्रम सादर केला जाणार असून यासाठी विविध बक्षीसे देण्यात येणार आहेत नवरात्रोत्सवाचा मार्गदर्शक सौ. मंजुश्री खर्डेकर व उत्सव प्रमुख सौ. कल्याणी खर्डेकर, सौ. श्वेताली भेलके व सौ. अक्षदा भेलके यांनी जाहीर केले. सर्व कार्यक्रम मोफत असून नागरिकांनी ह्या कार्यक्रमांचा आनंद लुटावा असे आवाहन विशाल भेलके, उमेश भेलके व प्रतीक खर्डेकर यांनी केले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधपान व दांडियाच्या आयोजनाने या महोत्सवाचा समापन होईल.