आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    पुण्यात १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान 'प्रवाह बिजनेस एक्स्पो २०२६', उद्योजकांना व्यवसायवृद्धीची संधी ग्रामीण प्रतिभेला राष्ट्रीय व्यासपीठाची संधी

    पुण्यात १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान 'प्रवाह बिजनेस एक्स्पो २०२६' चे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण प्रतिभेला संधी देणारी किसान क्रिकेट लीगही जाहीर झाली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : अग्रवाल समाज पुणे यांच्या वतीने 'प्रवाह बिजनेस एक्स्पो २०२६' या तीन दिवसीय व्यवसाय प्रदर्शनाचे आयोजन १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान डेक्कन कॉलेज मैदान, पुणे येथे करण्यात आले आहे. 'सोच से सफलता तक' या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योजक, व्यवसायिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांना एकाच व्यासपीठावर आणून व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा उद्देश आहे. अशी माहिती अग्रवाल समाज पुणेचे अध्यक्ष ईश्वरचंद गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    यावेळी अग्रवाल समाज पुणेचे सेक्रेटी संजय अग्रवाल, कोषाध्यक्ष दीपक बंसल, सहसचिव मुकेश कनोडीया आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात विविध क्षेत्रातील व्यावसायिक कंपन्या म्हणून उद्योजक सहभागी होणार असून, त्यांच्या उत्पादनांचे व सेवांचे प्रदर्शन करणार येणार आहे. यासोबतच प्रमुख व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, व्यावसायिक नेटवर्किंग आणि सामुदायिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील व्यवसायिकांच्या सहभागामुळे नवीन व्यावसायिक संबंध निर्माण करण्याची आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी, १६ ऑक्टोबर रोजी उद्घाटन समारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे कृषि मंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर 'लीडरशिप लेगेसी' या विषयावरील चर्चासत्र, महिला नेतृत्व आणि व्यवसायवृद्धी यावरली सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर अग्रवाल समाजासाठी डांडिया नाईटचे आयोजन करणार येणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी 'महासंगम समिट', ब्रँडनिर्मिती आणि नफावाढ या विषयावरील व्याख्यान, 'हिजरीत लीडर्स' चर्चासत्र तसेच 'आरोग्य संवाद : हेल्थ फर्स्ट' हा आरोग्यविषयक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

    नवी दिल्ली : ग्रामीण भारतातील क्रिकेटपटू आणि गावकऱ्यांना आपली प्रतिष्ठा सादर करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने इन-डॉट स्पोर्ट्स आणि प्रसार भारती यांनी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा केली. क्रीडा आणि मनोरंजन यांच्या संगम असलेल्या या उपक्रमातून ग्रामीण तसेच निमशहरी भागातील गुणवत्तांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. 'खेलेगा भारत, देखेगा इंडिया' हे लीगचे ध्येयवाक्य आहे. देशातील २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे सात संघ या स्पर्धेत सहभागी होतील. पहिल्या हंगामात १५ भटकांच्या क्रिकेट खेळवले जातील. या उपक्रमांतर्गत देशातील स्पर्धांमधून १२० क्रिकेटपटू आणि ३० गायकांची निवड केली जाईल. स्मार्टफोनद्वारे नोंदणी, डिजिटल छाननी आणि प्रत्यक्ष चाचणी या प्रक्रियांच्या माध्यमातून गुणवंतांचा शोध घेतला जाईल. निवडलेल्या गायकांच्या संगीतासह संगीतचित्रफिती आणि सामन्यांदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांत कला सादर करण्याची संधी मिळेल. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संचालक (आयएएस) श्री. विक्रम सिंग मलिक यांनी, किसान क्रिकेट लीगच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भारतातील क्रिकेटपटू किंवा गायक होण्याचे स्वप्न पाणाऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील, अशी आशा व्यक्त केली. तरुण पिढीला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आमची व्यासपिठे ही उत्तम दुवा म्हणून काम करतील. जोडीला आमच्याकडे संग्रहित आशयाचा मोठा साठा, मनोरंजन क्षेत्रातील काही अजरामर कार्यक्रम आणि आमच्या सहकाऱ्यांच्या उत्साह यांच्या जोरावर देशातील अद्भुत प्रतिभेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्याचबरोबर, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास उत्सुक असलेल्या आणि उत्साहाने आलेल्या भारतीय तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. लीगचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पांड़े यांनी ग्रामीण भागातील गुणवत्तांना संधी देण्याची गरज अधोरेखित केली. त्यांच्या मते, ग्रामीण भारतात गुणवत्ता आणि महत्त्वाकांक्षा असूनही प्रत्येकला संधी मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. लीगधील सामने, वास्तवाराधित मनोरंजन कार्यक्रम यशस्वी स्पर्धांची चरित्रे 'वेव्ह्ज', दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विनामूल्य उपलब्ध होतील.