आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    वर्षभरापासून पेन्शन मिळत नाही. कष्टकरी पेन्शनर कामगाराचा काय दोष

    टाटा मोटर्सच्या निवृत्त कामगारांना गेल्या वर्षभरापासून पेन्शन मिळत नसल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला असून लढा सुरू आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १६ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी : गेल्या आठ वर्षापासून टाटा मोटर्सच्या निवृत्त कामगाराचा वाढवे पेन्शन मिळावी, यासाठी लढा सुरू आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये कंपनीने स्वतःची TEPS पेन्शन स्कीम एजन्ट्रक करू करण्याचा असफल प्रयत्न केला. त्यानंतर असे ठरले की पेन्शन स्कीम EPFO कडे सरेंडर होई पर्यंत रिटायर्ड होणाऱ्या कामगाराला वयं वर्ष ६० पूर्ण झाल्यानंतर इंटरिम पेन्शन कंपनी देईल.म्हणून ऑक्टोबर २०१९ पासून कामगाराला पूर्वी सारखे LIC द्वारे पेन्शन मिळत नाही तर त्याला टाटा मोटर्स तर्फे इंटरिम पेन्शन मिळते.

    याचवेळेरी टाटा मोटर्स मधील वेगवेगळ्या केस दाखल करण्यात आल्या. कामगारांना सुद्धा इतर कंपन्यामधील कामगारांपमाणे वय वर्ष ५८ पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळावे या साठी रिटायर्ड कामगार पेन्शन कमिटीने फार मोठा संघर्ष केला. सतत चार ते पाच वर्ष विविध सरकारी पाठवून्यावर ५८ वर्षानंतरच्या पेन्शन साठी लढा दिल्या नंतर, 'टेल्को एम्प्लॉईज पेन्शन ट्रस्ट' ने मीटिंग घेऊन मार्च २०२३ पासून युनियनटी ट्रस्टी आणि मॅनेजमेंट ट्रस्टींनी कामगाराला वयाची ५८ वर्ष पूर्ण केल्या नंतर पेन्शन देण्यास मान्यता दिली. त्यानंतर दिल्ली हाईकोर्टात कामगारांच्या पेन्शन विषयी सप्टेंबर २०२३ मध्ये दोन वेगवेगळ्या केस दाखल करण्यात आल्या.