आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    सेवा संकल्प अभियानांतर्गत वायसीएम रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न

    पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात १०४ जणांनी रक्तदान केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १६ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वायसीएम रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने 'सेवा संकल्प अभियानांतर्गत' रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वायसीएम रुग्णालयातील चाणक्य हॉल येथे आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये एकूण १९५ जणांनी नोंदणी केली, त्यापैकी १०४ रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. यामध्ये ८४ पुरुष आणि २० महिला रक्तदात्यांचा समावेश होता.

    महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भवरसार आणि नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर पार पडले. रक्तदान हे गरजूंना जीवनदान देण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार सुरक्षित रक्त उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांमध्ये नियमित रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 'सेवा संकल्प अभियानांच्या' माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर महापालिका भर आहे.

    या शिबिराच्या यशासाठी महापालिकेच्या कुटुंबकल्याण विभागाचे आणि वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाचे विशेष सहकार्य लाभले. रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता तायडे आणि डॉ. हर्षदा बाविस्कर यांनी शिबिराच्या नियोजनात व अमलबजावणीत मोलाचे योगदान दिले. संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या या उपक्रमासाठी विशेष योगदान लाभले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना रक्तदानासह विविध आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.