आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    आरटीओ चलनाची नावाखाली २४ लाखांची सायबर लूट, APK फाइल इन्स्टॉल करताच ज्येष्ठ नागरिकाला गंडा; झारखंड येथून दोघांना अटक

    आरटीओ चलनाची बनावट APK फाइल इन्स्टॉल करण्यास सांगून ज्येष्ठ नागरिकाची २४ लाखांहून अधिक फसवणूक करणाऱ्या दोघांना झारखंडमधून अटक करण्यात आली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १६ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी : आरटीओ चलनाची माहिती तपासण्याच्या बहाण्याने मोबाईलमध्ये बनावट APK फाइल इन्स्टॉल करण्यास सांगून एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २४ लाख ३५ हजार ५८३ रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करत आळंदी पोलिसांनी झारखंडमधील जामतारा परिसρινून दोन जणांना अटक केली आहे. सायबर चोरट्यांनी मोबाईलचा अ‍ॅक्सेस मिळवून सुमारे ७० लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) मोडल्याची माहितीही समोर आली आहे. व्हॉट्सॲपवर आली APK फाइल अन् लाखांचा फटका! फसवणुकीतील तक्रारदार हे भाजीपाला वाहतूक व्यवसाय करणारे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर 'आरटीओ चलन' नावाची APK फाइल आली होती. व्हॉट्सॲपवरील दंड तपासण्यासाठी त्यांनी ही फाइल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली. मात्र, या फाइलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस मिळवला. त्यानंतर काही काळाने त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे संदेश मोबाईलवर आले. तपासणी केली असता त्यांच्या खात्यातून तब्बल २४ लाख ३५ हजार ५६३ रुपये वळवण्यात आल्याचे उघड झाले. या फसवणुकीत सुमारे ७० लाख रुपयांची एफडी मोडण्यात आल्याची बाब समोर आली. क्रेडिट कार्डच्या आमिषातून फसवणुकीचे जाळे या प्रकरणात विष्णुप्रसाद वर्मा (वय २५) आणि विनोद मंडल (वय ४२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासानुसार, क्रेडिट कार्डची देय रक्कम भरण्याचे तसेच क्रेडिट वाढवून देण्याचे आमिष दाखवून कार्ड मिळवले जाते. या कार्डावर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल फोन, पाच क्रेडिट कार्ड आणि बँक खात्यांच्या पासवर्डशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नागरिकांनो, अनोळखी APK फाईलपासून सावध राहा! आरटीओ चलनाची माहिती तपासण्यासाठी नावखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. व्हॉट्सॲप किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली अनोळखी APK फाइल इन्स्टॉल करू नये. तसेच, क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. वाहनवरील ई-चलन तपासण्यासाठी केवळ अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.