मोशी येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पतीसह चार आरोर्पींना २४ तासांत अटक
मोशी परिसरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीसह चार जणांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे.
पिंपरी : पिंपरी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा धारदार शस्त्राने वार करून आणि चेहरा विद्रूप करून खून केल्याच्या आरोपीखाली पतीसह चार जणांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २४ तासांत अटक केली केली आहे. बोहडेवाडी, मोशी येथील ऑफिससमोर ही घटना घडली थी. पोलिसांची गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधार पा पोलिसांनी मृत महिलेची ओळख प्रियांका आकाश कांबळे अशी पटवली. पोलिसांच्या तपासानुसार, प्रियांका हिच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिचा पती आकाश उर्फ रमेश कांबळे याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात प्रथम कांबळे, रोहित शिंदे आणि दिनेश वाघमारे या तिघांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
गुन्ह्यानंतर पळून गेलेल्या चारही आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना २४ तासांच्या आत अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायायल्याने १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत असून, गुन्ह्यामागिल नेमकी कारणे आणि गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास सुरू आहे.
