पुणे दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्याकडून गुडन्युज, नव्या मेडिकल कॉलेजला मान्यता
पुण्यात नव्या मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली असून एमबीबीएसच्या ५० जागा सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली.

पुणे : पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यात नव्या मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस आज दुपारपासून पुणे दौरऱ्यावर आहेत. त्यांनी भाजप नगरसेवकांच्या पदाधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पुण्यात नव्या मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाल्याची पहिली बातमी दिली. पुणेकरांची ही मागणी त्यांनी केली न्यायालयाने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पुणेकरांना एक चांगली बातमी देतो. आपल्याला माहिती आहे की, आपल्या एसआयसी हॉस्पिटलला मेडिकल कॉलेज करण्यासाठी एक प्रस्ताव दाखल झाला होता. दोनवेळा नॅशनल मेडिकल कौन्सिलने तो नाकारला होता. त्यासंदर्भात आपण केंद्रीय मंत्र्याकडे अपील केलं होतं. केंद्रीय मंत्र्या आज तो अपील मान्य करून एमबीबीएसच्या ५० जागांकरिता एसीईच्या मेडिकल कॉलेजला मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणेकरांची मागणी झाली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चझड परीक्षा पारदर्शकेसाठी सरकार कटिबद्ध आहे. चझड मध्ये पारदर्शक कारभार व्हावा, यासाठी चौकशी समिती आणि व्ही. सहानी समिती नेमली आहे. सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी आणि याची जास्तीत जास्त भारती व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक पाठिंबा रहील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 'शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवायचं नाही' दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांची आगाऊ मदत देणार आहोत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लवकर शासन निर्णय काढून १२ उपाययोजना सुरू केल्या. दुष्काळाचा लाभ ३६५ तालुक्यांपर्यंत पोहोचवला. पूर्वी शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये दिले जात होते; मात्र सरकारने पाच हजार रुपयांची आगाऊ मदत दिली. शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे मदतीपासून वंचित ठेवायचं नाही, ही सरकारची भूमिका आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ऊस गाळप हंगाम आणि रेषबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन. हे वर्ष अडचणीचं असून ऊस कमी असण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी लवकर लवकर गाळप सुरू करावं. शेतकऱ्यांना रेष चांगली दिली जात आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेતાં सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास सांगितलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
