आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

    दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्राचा शुभारंभ करण्यात आला असून यामुळे भाषा शिक्षणाला गती मिळेल असे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी म्हटले आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १६ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : मुंबई : दृकश्राव्य माध्यमातून समान भाषेतील उपशीर्षके उपलब्ध झाल्यामुळे भाषेचे आकलन आणि वाचन वाढण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे निश्चितच भाषा शिक्षणाला गती येईल, असा विश्वास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला. वरळी येथील दूरदर्शन केंद्रात प्लॅनेट रीड 'मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा शुभारंभ सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर दूरदर्शन केंद्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दूरदर्शन केंद्र मुंबईचे उपसंचालक (अभियांत्रिकी) हेमंत देसाई, गणेश अय्यर आणि आयआयटी दिल्लीचे सहायक प्राध्यापक तथा 'विलियन रीडर्स'चे प्रमुख प्रा. ब्रिज कोठारी उपस्थित होते.

    या उपक्रमांतर्गत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील मराठी मनोरंजन कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेतून देवनागरी लिपीत उपशीर्षके देण्यात येत आहेत. यामुळे कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येक्याचे मराठी वाचन होणार आहे. मराठी भाषा वाचनामुळे तरुण आणि श्रवणदिव्यांगांचा याचा मोठा लाभ होईल. अशा प्रकारे प्रादेशिक भाषेतून उपशीर्षके देण्याच्या या उपक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाराष्ट्रात झाली आहे. या उपक्रमाची सुरुवात राज्य शासन, प्रसार भारती, आयआयटी दिल्ली आणि प्लॅनेट रीड यांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले, की अभिनव उपक्रमामुळे श्रवणदिव्यांग व्यक्तींनाही कथा, कथानक आणि पटकथेतील घडामोडी समजून घेता येतील. लिखित शब्दांचे महत्त्व जपण्याच्या या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे. दैनंदिन व्यवहारात भाषा बोलणाऱ्या अनेकांना लिखित भाषेचे संपूर्ण विश्व उपलब्ध होत नाही. त्यामुळे लिखित शब्दांचे महत्त्व हरवू देता नये. समान भाषेतील उपशीर्षके हा त्यासाठी सोपा आणि परिणामकारक तंत्रज्ञानावर आधारित उपाय आहे, असेही सिंह म्हणाले.