आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी औषधनिर्मिती कंपन्यांनी संशोधनावर भर द्यावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन व नवोन्मेषाला चालना देऊन आरोग्यसेवा दर्जेदार आणि परवडणारी करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अॅस्ट्राझेनेका फार्मा इंडियाच्या गोरेगाव येथील जागतिक मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देऊन आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, परवडणारी आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठे, संशोधन संस्था आणि औषधनिर्मिती कंपन्यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास मोठ्या प्रमाणात प्रगती साध्य करता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    अॅस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडच्या गोरेगाव, मुंबई येथील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली, आशियाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.

    कोव्हिड काळात अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड लशीने नागरिकांना मोठा आधार दिला. देशात बल्क ड्रग पार्क उभारण्यात येत असून, त्यात अॅस्ट्राझेनेकाचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले.