आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    मनोरंजन

    अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; बीएमसीचे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या

    मुंबईतील जुहू भागात असलेल्या अभिनेता अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे. नोटीस देऊनही काम न थांबवल्याने पालिकेने भिंती आणि खिडक्या तोडल्या.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : मुंबईच्या जुहू भागात असलेल्या बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा हातोडा चालवला आहे. बंगल्याच्या आवारात सुरू असलेल्या स्पा सेंटरच्या बांधकामावर पालिकेने तोडक कारवाई केली.

    पालिकेच्या के-वेस्ट विभागाने तात्काळ काम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही काम सुरू राहिल्याने पालिकेच्या पथकाने थेट बंगल्यात जाऊन अनधिकृत भिंती आणि खिडक्या पाडल्या. हे कॉपोल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील मालमत्तेत घडले आहे.