आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने भाजप-महायुतीच्या प्रचारला नवी ऊर्जा; कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा विश्वास

    पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुणे व सांगली दौऱ्यामुळे प्रचार अभियानाला गती मिळाली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी रणनीती आखण्यात आली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दोन दिवसीय पुणे व सांगली दौऱ्यामुळे भाजप-महायुतीच्या प्रचाराला नवी दिशा मिळाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सांगलीत घेतलेल्या बैठकांमध्ये त्यांनी निवडणुकीच्या रणनीतीचा सविस्तर आढावा घेतला.

    चव्हाण यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ, आमदार माधवी नाईक, आमदार विक्रांत पाटील, आमदार योगेश सागर आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

    दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व घटकांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी या वेळी केले.