उषाने निसर्गापासून प्रेरित सहा डिझायनर सीलिंग फॅन्ससह आपली ब्लूम सिरीज (Bloom Series) नव्या रूपात सादर केली
उषा इंटरनॅशनलने ६ डिझायनर मॉडेल्ससह आपली प्रीमियम 'ब्लूम सिरीज' फॅन श्रेणी नव्या रूपात सादर केली आहे. हे फॅन्स BLDC तंत्रज्ञानामुळे ३८ व्हॉट विजेचा वापर करून ऊर्जा बचत करतात.
पुणे : उषा इंटरनॅशनलने निसर्गाच्या सौंदर्यापासून प्रेरित होऊन आपली प्रीमियम 'ब्लूम सिरीज' (Bloom Series) सीलिंग फॅन्स नव्या रूपात बाजारात आणली आहे. यामध्ये उषा ब्लूम लिली नोव्हा, डालिया, प्लुमेरिया आणि हेलिनियम यांसारख्या आकर्षक मॉडेल्सचा समावेश आहे.
या फॅन्समध्ये BLDC तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ते केवळ ३८ व्हॉट विजेवर चालतात. ३५० RPM वेगाने २४४ घनमीटर/मिनिट हवा देण्याची क्षमता यात आहे. उन्हाळ्यात थंड हवा आणि हिवाळ्यात ऊबदार हवा देणारे बायडायरेक्शनल फीचर्स या मालिकेत देण्यात आले आहेत.
