आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम

    पुणे जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून १७, १८ तसेच २४ व २५ ऑक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे जिल्ह्यात २१ मतदार नोंदणी अधिकारी, ६४७ सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि ८ हजार ४२४ बीएलओ (स्तरीय अधिकारी) या मोहिमेसाठी कार्यरत आहेत. नागरिकांना प्रारूप मतदार यादीत नाव शोधणे, दुरुस्ती करणे किंवा नवीन नाव नोंदवण्यासाठी फॉर्म नंबर ६, ७ आणि ८ भरण्याची सोय करण्यात आली आहे.

    जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व पात्र नागरिकांनी, विशेषतः तरुण मतदारांनी, या शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीत नाव नोंदवण्याचे आवाहन केले आहे. मतदार यादीबाबत काही अडचणी असल्यास १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.