राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दादर येथील बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या हस्ते क्लबच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दादर येथील प्रसिद्ध बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट दिली. पूजेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी क्लबच्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन केले.
दुर्गापूजा हा सर्वांना एकत्र आणणारा आणि सामाजिक एकोपा जपणारा सण आहे, असे राज्यपाल या वेळी म्हणाले. कार्यक्रमाला बंगाल क्लबचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
