मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार 'मंगळ्रिन'चा भव्य सिनेमॅटिक प्रवास, २३ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
शुभम संजय शेवडे लिखित आणि दिग्दर्शित 'मंगळ्रिन' हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गोवा आणि महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट साकारण्यात आला आहे.

पुणे : आपल्या आजूबाजूच्या जगापलीकडे जाऊन जगणाऱ्या माणसांची कथा सांगणारा 'मंगळ्रिन' हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. शुभम संजय शेवडे आणि अपर्णा कुलकर्णी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
गोव्यातील दत्तवाड येथे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. प्रतीक हंडोरे यांनी पटकथा आणि संवाद लिहिले असून, सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी दत्तराज कुवळेकर यांनी सांभाळली आहे. विलक्षण केंडवाल यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.
