आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

    राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील पशुपालकांसाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने'च्या अटी शिथिल करून मोठा दिलासा दिला आहे. चारा बियाणे वाटपासाठी पशूंच्या किमान संख्येची अट रद्द करण्यात आली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : सन २०२६-२७ मध्ये कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील पशुपालकांना दिलासा देण्यासाठी शासनाने चारा बियाणे व ठोंबे वाटपातील अटी शिथिल केल्या आहेत. वैयक्तिक लाभार्थी आणि शेतकरी गटांना एकापेक्षा जास्त वेळा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

    योजनेनुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना ४ हजार रुपयांचे चारा बियाणे १०० टक्के अनुदानावर दिले जाते. तसेच शेतकरी गटांना २० हजार रुपयांपर्यंतचे बियाणे दिले जाते. दुष्काळी स्थितीत सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त चारा उत्पादन घेता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

    अधिक माहितीसाठी पशुपालकांनी १९६२ या कॉल सेंटर क्रमांकावर किंवा ९०६३१४२२९९ या व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.