आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    आबासाहेब अत्रे प्रशालयेत विद्यार्थ्यांसाठी जलकुंभ

    आर आर काबिलच्या सीएसआर उपक्रमांतर्गत पुण्यातील रास्ता पेठेतील आबासाहेब अत्रे प्रशालयेत विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जलकुंभाचे उद्घाटन करण्यात आले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी अत्यंत आवश्यक असल्याने आर आर काबिल आणि निरंजन सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने रास्ता पेठेतील आबासाहेब अत्रे प्रशालयेत जलकुंभ उभारण्यात आला. आर आर ग्लोबलच्या संचालिका कीर्ती काबरा यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.

    बीड जिल्ह्यातील दोन आणि पुण्यातील दोन अशा एकूण चार शाळांमध्ये हे जलकुंभ उभारण्यात आले असून या उपक्रमासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

    या कार्यक्रमास सेफ पॅक इंडस्ट्रीजच्या संचालिका अंजली तापडिया, नीलम परतानी, अभय करवा, भारत वेदपाठक, संजीव महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.