आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    उल्हास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत २५ ऑक्टोबरला राज्यभर FLNAT परीक्षा; राज्यातील सुमारे ७ लाख परीक्षार्थी सहभागी

    'उल्हास-नव भारत साक्षरता कार्यक्रमा' अंतर्गत २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यभरात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) आयोजित केली आहे. यात सुमारे ७ लाख परीक्षार्थी सहभागी होणार आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : १५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या असाक्षर व्यक्तींसाठी २५ ऑक्टोबर रोजी राज्यभरात FLNAT परीक्षा घेतली जाणार आहे. १५० गुणांच्या या परीक्षेत वाचन, लेखन आणि संख्याज्ञान यावर आधारित प्रश्न असतील.

    परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा शिक्षण संचालक (योजना) आणि साक्षरता प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. परीक्षार्थींना आधार कार्ड, मतदार कार्ड किंवा बँक पासबुक ही ओळखपत्रे सोबत आणावी लागतील.

    परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांना एनआयओएस (NIOS) किंवा राज्य मुक्त विद्यालयामार्फत पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.