आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    समाज कल्याण विभागामार्फत पुणे जिल्ह्यात 'सेवा संकल्प अभियाना' अंतर्गत विविध उपक्रम

    पुणे जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबवून विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम पार पाडण्यात आले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्ती जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्यात आले.

    या अभियानांतर्गत राज्यस्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.