पीक पंचनामे गतीने पूर्ण करा; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी व दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे गतीने आणि अचूक पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

पुणे : पुणे जिल्ह्यातील नुकसानीबाबत विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यकांनी संयुक्त पाहणी करून त्वरित अहवाल सादर करावा, असे त्यांनी बजावले.
जिल्ह्यात ८२ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित काम तातडीने संपवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रब्बी हंगामासाठी चारा उपलब्धता आणि जलपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला.
