आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पिंपरी विधानसभेत भाजप आमदार अमित गोरखे व उमा खापरे यांच्या उपस्थितीत पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी विभागवार बैठका

    पिंपरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले. आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे या वेळी उपस्थित होते.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभेत भाजपच्या संघटनात्मक बैठका पार पडल्या. महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी रणनीती आखण्यात आली.

    आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, पदवीधर व शिक्षक हे समाजाचा मुख्य घटक असून त्यांच्या प्रश्नांवर सातत्याने संवाद साधणे ही पक्षाची जबाबदारी आहे. बैठकीस जयदीप खापरे, मंगेश धाडगे, अनिता वाळुंजकर आदी उपस्थित होते.

    २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान पार पडणार असून नोंदणीकृत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले.