आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    भाविकांची सुरक्षितता, सुलभ वाहतूक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळण्याला प्राधान्य द्या : पालकमंत्री गिरीश महाजन

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना भाविकांची सुरक्षितता, सुलभ वाहतूक आणि स्थानिक नागरिकांची सोय याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    नाशिक : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन बोलत होते. बैठकीस खासदार गोकुळ जिंतूरकर, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद आदी उपस्थित होते.

    ध्वजारोहण सोहळा भव्यदिव्य आणि शिस्तबद्ध व्हावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. भाविकांच्या येण्या-जाण्यासाठी सुकर मार्ग, पार्किंग आणि आपत्कालीन व्यवस्था प्रभावी असावी, असे आदेश महाजन यांनी दिले.

    'हर घर भगवा ध्वज' उपक्रमासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.