मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने माता, अर्भक व लहान बालक पोषण कार्यक्रमात आता चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश
चंद्रपूर जिल्ह्यातील माता आणि बालकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी राज्य शासनाने 'माता, अर्भक व लहान बालक पोषण कार्यक्रमात' चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश केला आहे. आयआयटी मुंबईच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाईल.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बालकांचे कुपोषण कमी करणे, त्यांचे वजन व शारीरिक वाढ सुधारणे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने विशेष पोषण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
आयआयटी मुंबईच्या अभिनव संकल्पनेतून विकसित झालेला हा कार्यक्रम 'व्हिल्स ग्लोबल फाउंडेशन' आणि 'आयआयटी मुंबई'च्या सहकार्याने राबवला जात आहे. आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांना यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल.
बालकाच्या पहिल्या दोन वर्षांतील पोषणावर विशेष भर देऊन कुपोषण टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
