आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    डरपोक, भाडोत्री..सोडणार नाही, पोलिसांना धागेदोरे सापडले : मुख्यमंत्री

    मुंबईतील जुहू पोलीस ठाण्याजवळ अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १९ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : मुंबईतील जुहू पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० मीटरवर अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर १८ ऑक्टोबरच्या रात्री तीन अज्ञात हल्लेखोरांनी १० गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुखरूप असला तरी त्याचा कारचालक फिरदोस आणि एक रिक्षाचालक जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे.

    या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, "हल्लेखोरांना पोलीस शोधतीलच, पण यामागे कोण आहेत त्यांनाही मुंबई पोलीस शोधून काढतील. अशा प्रकारच्या घटनेत कोणालाही सोडलं जाणार नाही," असा इशारा दिला. तसेच महाराष्ट्र पोलीस बिश्नोई गँगचे नेटवर्क उद्ध्वस्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.