विविध दुर्गा उत्सव मंडळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विविध दुर्गा उत्सव मंडळांना भेट देऊन श्री दुर्गा माता मूर्तींचे दर्शन घेतले.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील विविध दुर्गा उत्सव मंडळांना भेट देऊन तेथील दुर्गा माता मूर्तींचे दर्शन घेतले. त्यांनी न्यू डायमंड दुर्गा उत्सव मंडळ बारा खोली पारवतीनगर, श्री दुर्गा माता उत्सव मंडळ सुयोग नगर, युवा दुर्गा उत्सव मंडळ बारा सिग्नल, श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती रेल्वे कॉलनी अजनी, पाटीदार समाज दुर्गा महोत्सव घाट रोड यासह शहरातील विविध मंडळांना भेट दिली.
