राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट
मुंबईतील शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले आणि स्मरणिकेचे प्रकाशन केले.

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट देऊन श्री देवी दुर्गाची पूजा करून दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांच्या हस्ते बंगाल क्लबच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
राज्यपाल म्हणाले की, बंगाल क्लबतर्फे आयोजित दुर्गापूजा हा सर्वांना एकत्र आणणारा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव आहे. समाजाची खरी ताकद ही आर्थिक संपत्तीपेक्षा संस्कृती आणि एकजुटीत आहे.
