जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू
जळगावजवळील बांभोरी उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

जळगाव : जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पंकज प्रकाश चौधरी (३०), रवींद्र अरुण चौधरी (३०) आणि हरीश हिम्मत चौधरी (३२, सर्व रा. जुरखेडा, ता. धरणगाव) अशी मृतांची नावे आहेत.
हे तरुण कारने जळगावहून जुरखेडा या आपल्या गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भयानक होती की कारचा चक्काचूर झाला. पाळधी जवळ बनवली येथे देवीच्या यात्रेला नातेवाईकांना सोडण्यासाठी ते गेले होते.
