आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    शाळांच्या दिवाळीच्या सुटीत बदल, शाळास्तरावर गोंधळ

    पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिवाळी सुटीच्या वेळापत्रकात अचानक बदल केल्यामुळे शाळा व पालकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांच्या दिवाळी सुटीच्या वेळापत्रकात बदल केला असून आता ५ ते १८ नोव्हेंबरऐवजी २ ते १४ नोव्हेंबर असा सुटीचा कालावधी जाहीर केला आहे. या अचानक बदलामुळे शाळांच्या परीक्षेच्या नियोजनात गोंधळ निर्माण झाला आहे.

    काही शाळांनी २ नोव्हेंबरपासून सुटी गृहीत धरून परीक्षांचे नियोजन बदलले, तर काही शाळांनी ४ नोव्हेंबरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एन वेळी सुटीच्या तारखा बदलल्याने पालकांच्या प्रवासाच्या नियोजनावरही परिणाम झाला आहे.