डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप मध्ये स्पेनच्या युजेनिओ चंकारा याला विजेतेपद
दिल्ली गोल्फ कोर्सवर पार पडलेल्या ४० लाख डॉलर बक्षीस रकमेच्या डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप गोल्फ स्पर्धेत स्पेनच्या युजेनिओ चंकाराने विजेतेपद पटकावले.
पुणे : स्पेनच्या युजेनिओ चंकाराने तिसऱ्या फेरीत मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम राखत डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. दिल्ली गोल्फ कोर्सवर पार पडलेल्या या ४० लाख डॉलरच्या स्पर्धेत त्याने एकूण २१ अंडर गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले.
त्याने अंतिम फेरीत ६७-६७-६३-७० अशी कामगिरी केली. टॉमी फ्लीटवुड याला मागे टाकत त्याने हे मानाचे विजेतेपद मिळवले.
