रब्बी ज्वारीच्या बियाण्यांसाठी ५० टक्के अनुदान; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उप अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी प्रमाणित ज्वारी बियाण्यांवर ५० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उप अभियान (NFSNM-NC) अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षात रब्बी हंगामासाठी प्रमाणित ज्वारी बियाण्यांवर ५० टक्के अनुदानावर वितरण करण्यात येणार आहे. पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे (https://mahadbt.maharashtra.gov.in) ऑनलाईन अर्ज करावेत.
याशिवाय पौष्टिक तृणधान्य उप अभियानांतर्गत शेतकरी गटांना पीक प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे. १० वर्षांच्या आतील वाणांसाठी प्रतिकिलो ३० रुपये तर १० वर्षांवरील वाणांसाठी प्रतिकिलो १५ रुपये अनुदान देय आहे.
