मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र व मॉडेल शाळेतील सुविधांचे ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून कौतुक
ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन कौतुक केले.

पुणे : ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
आरोग्य केंद्रातील स्वच्छता, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि शाळेतील कौशल्याधारित शिक्षण प्रणालीचे त्यांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य आणि शिक्षण पुरवणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
