आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    अंध व दुर्बल मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश

    पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अंध व दुर्बल मतदारांना मतदान केंद्रावर विशेष सुविधा देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अंध व दुर्बल मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी व विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले आहेत.

    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना दिव्यांग मतदारांसाठी मदतनीस, रॅम्प व इतर आवश्यक मदत पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.